पंजाब मेलमधून सव्वा लाखांचा ऐवज लांबवला


A compensation of half a lakh was delayed from Punjab Mail भुसावळ :  प्रवासी झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी पंजाब मेलमधून प्रवास एक लाख 37 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी भोपाळ लोहमार्ग पोलिसांकडून शून्य क्रमांकाने कागदपत्रे आल्यावर बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा
शुभम मिश्रा (भोपाळ) हे 26 फेब्रुवारीला पंजाब मेलच्या ए-1 या डब्यातील 49 क्रमांकाच्या सीटवरून प्रवास करीत असतांना त्यांना झोप लागली. चोरट्यांने संधी साधत मनमाड ते जळगाव या दरम्यान रात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांची पिशवी लांबविली. त्यात मोबाईल, सोन्याच्या रींगसह अन्य साहित्य होते. चोरट्याने एक लाख 37 हजार 400 रुपयांचा ऐवज लांबविला आहे. पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र ठाकूर तपास करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !