जळगावातील दोघे कुविख्यात गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ


Two notorious criminals from Jalgaon deported from the district जळगाव : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या व पोलिस दप्तरी कुविख्यात म्हणून ख्याती असलेल्या दोघा संशयीतांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संदीप भास्कर ढोके (24, गेंदालाल मिल, जळगाव) व विशाल वाल्मीक जाधव (23, गेंदालाल मिल, जळगाव) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कारवाई
संशयित विशाल व संदीप यांच्याविरोधात जबरी, हाणामारी यासह गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. संशयित जामिनावर आल्यानंतर पुन्हा टोळीद्वारे दहशत निर्माण करीत असल्याने जळगाव शहर पोलिसांनी संबंधिताना हद्दपा करण्याबाबत प्रस्ताव तयार करून तो जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. प्रस्तावाची छाननी होवून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दोघांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !