वाळू चोरीतील भडगावातील संशयीत तीन जिल्ह्यातून हद्दपार

प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या आदेशाने वाळू चोरट्यांमध्ये खळबळ


Bhadgaon suspect in sand theft deported from three districts भडगाव : बेकायदेशीर कृत्यासह वाळुच्या चोरीत संशयित गुन्हेगार असलेल्या पंकज दीपक मोरे (24, यशवंत नगर, भडगाव) यास पाचोा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी जळगाव, धुळे व नाशिक या जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार केल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

कारवाईने उडाली खळबळ
पंकज मोरे हा 2020 पासून बेकायदेशीर कृत्यात तसेच बेकायदेशीर वाळू चोरीच्या गुन्हेगारीत सामील आहे. 31 ऑक्टोबर 2021 रोजी मंडळ अधिकारी विजय भानुदास येवले व त्यांचे सहकारी हे भडगाव-पाचोरा रोडवर शासकीय आयटीआय जवळ अवैध गौणखनिज कारवाई कामी हजर असतांना विना नंबरचे ट्रॉली व व ट्रॅक्टरद्वारे वाळू चोरी करतांना आढळल्याने
पंकज दीपक मोरे याने मंडळ अधिकारी विजय येवले यांना धक्काबुक्की केली व सोबत असलेले तलाठी योगेश ब्राह्मणे, मंडळ अधिकारी एन. जी. बागड यांना दमदाटी करून ट्रॅक्टरमधील गौण खनिज (वाळू) खाली करून ट्रॉलीसह पळ काढला होता व शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. याबाबत पाचोरा पोलिसात पंकज मोरेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !