अनैतिक संबंध उघड न येण्यासाठी मुलाची हत्या : आईसह दोघांना जन्मठेप, अमळनेर न्यायालयाचा निकाल


Killing of child to avoid exposure of adultery : Life imprisonment with mother along with lover अमळनेर : अनैतिक संबंध लपवण्यासाठी पोटच्या मुलाला संपवल्याची घटना 2 फेब्रुवारी 2019 मध्ये घडली होती. या प्रकरणातील आईसह दोघा आरोपींना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.

अनैतिक संबंध लपवण्यासाठी केली हत्या
2 फेब्रुवारी 2019 मध्ये तक्रारदार यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद चोपडा पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांत नोंद करण्यात आली होती मात्र पोलिस तपासात आईने व मामाने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी मुलाला संपविल्याचे समोर आले होते. दरम्यान दोघा आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी 3 मार्च रोजी जिल्हा न्यायाधीश पी.आर.चौधरी यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले त्यामध्ये सरकारी वकील अ‍ॅड.किशोर आर. बागुल यांनी कामकाज पाहिले.

जन्मठेपेसह दंडाची शिक्षा
खटल्यात एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये सरकार पक्षातर्फे गीताबाईचे पती दगडु लोटन पाटील, बहिण प्रतिभा दगडु पाटील, प्रदीप कुलदिप पाटील, डॉ. निलेश देवराज तसेच डॉ. स्वप्नील कळसकर तसेच श्वान पथक जळगाव व तपासणी अधिकारी मनोज पवार, ए.पी.आय.योगेश तांदळे यांनी प्रथमिक तपास केला त्यानंतर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पुढील तपास केला. या खटल्यात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व दंड रुपये 300/- दंड व दंड न भरल्यास 15 दिवस सश्रम कारावास, तसेच भा.द.वि. कलम 201 प्रमाणे दोन वर्षे सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या कामी पैरवी अधिकारी, ए.एस.आय. उदयसिंग साळुंके, व पो. नाईक हिरालाल पाटील, व चोपडा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस कॉ. नितीन दिलीप कापडणे व पो.हवलदार हरीप तेली यांनी काम पाहिले. दरम्यान, आरोपी कारागृत असल्याने वकील लावण्याची परीस्थिती नसल्याने त्यांना शासनाकडून विधी व सेवा समितीकडून वकील देण्यात आले होते त्यामुळे आरोपीतांना कमीत कमी दंड करण्यात आला, असे सहा. सरकारी वकील अ‍ॅड.के.आर.बागुल यांनी कळवले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !