पथराडे येथील विवाहितेचा छळ : शिरपूरच्या पतीसह तिघांविरोधात गुन्हा


Harassment of a married woman in Patharade: A case against three including the husband of Shirpur यावल : तालुक्यातील पथराडे येथील माहेर असलेल्या 25 वर्षीय विवाहितेने घर बांधण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याने पतीसह तिघत्तंनी छळ करीत शिविगाळ करून मारहाण केले व विवाहितेला माहेरी पाठवून दिले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल पोलिसात तिघांविरोधात गुन्हा
पथराडे, ता.यावल येथील कोनिका सोपान सूर्यवंशी (25) या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह सोपान भास्कर सूर्यवंशी (रा.सावित्री फुले नगर, वरवाडे मांडळ रोड, शिरपूर) यांच्याशी झाला होता. पती सोपान भास्कर सूर्यवंशी, सासरे भास्कर वामन सूर्यवंशी व सासू सिंधुबाई भास्कर सूर्यवंशी या तिघांनी विवाहितेला घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आण व दागिने घेण्यासाठी सुद्धा पैसे आण, असे सांगून तिचा मानसिक आणि शारीरीक छळ सुरू केला व विवाहितेला मारहाण केली. विवाहितेने पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर माहेरी सोडून देण्यात आले. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !