यावलला पालिका मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीला हार टाकून आंदोलन

महाविकास आघाडीच्या अनोख्या आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा : कायमस्वरूपी मुख्याधिकार्‍यांची मागणी


Protest by throwing garlands on the chair of Yawal Municipal Commissioner यावल : यावल नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा म्हणून महाविकास आघाडीकडून नगरपालिकेत अनोखे आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीला हार टाकून गांधीगिरी करण्यात आली व तहसील कार्यालयात निवेदन देऊन कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा व ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांनी किमान आठवड्यातून दोन दिवस यावलला द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

महाविकास आघाडीच्या आंदोलनाची चर्चा
यावल नगरपरीषदेमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मोहसीन खान अब्दुल वहाब खान यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. नगरपालिकेत मुख्याधिकार्‍यांच्या रीकाम्या खुर्चीला हार टाकून गांधीगिरी करण्यात आलीव व कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर राष्ट्रवादीचे मोहसीन खान, शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शरद कोळी, आबीद कच्छी, संतोष खर्चे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, सय्यद सईद, गुणवंत निळं, प्रतिभा निळ, अरुण लोखंडे, कामराज घारू, फारुख हाजी, बापू जासूद, आरिफ खान, एजाज मणियार, अनिकेत तडवी, आसीफ शेख, इरफान खान, नीलिमा धांडे, ललित पाटील, शरीफ तडवी, प्रकाश पारधे, संतोष धोबीसह आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !