मुक्ताईनगरात महावितरणतर्फे लाईनमन दिननिमित्त कर्मचार्‍यांचा सन्मान


मुक्ताईनगर : शहरात महावितरण कंपनीतर्फे लाईनमन दिनानिमित्त कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला तसेच प्रसंगी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुक्ताईनगर विभागाचे कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता अध्यक्षस्थानी होते. आरोग्य तपासणी शिबिरात 70 कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली. उपस्थित जनमित्रांना ‘प्रकाशदूत’ म्हणून गौरविण्यात आले तर एकूण 49 कर्मचार्‍यांना तांत्रिक/महसूल कामात विशेष योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
मुक्ताईनगर विभागाचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांनी सर्व कर्मचारी अधिकारी यांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सुरक्षेची प्रतिज्ञा घेतली. यावेळी मुक्ताईनगर उपविभागाचे उपकार्यकरी अभियंता ज्ञानेश्वर ढोले, वरणगावचे तुषार गजरे व बोदवडचे सचिन मुंढे हे प्रामुख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन वराडे यांनी तर आभार प्रदर्शन गणगणे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !