सेवानिवृत्त शिक्षकाकडे धाडसी चोरी : साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला


Dared theft from a retired teacher: Five and a half lakh compensation was stolen चोपडा : तालुक्यातील हातेड खुर्द येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव श्रीराम पाटील यांच्या बंद घरातून रोकडसह सोन्याचे दागिने मिळून पाच लाख 22 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मका विक्रीच्या पैशांसह ऐवजावर डल्ला
हातेड खुर्द येथील शिवाजीराव पाटील हे पत्नी सुशीलाबाई, आई अंजनाबाई यांच्यासोबत राहतात. त्यांनी नुकताच मका विकल्याने त्याचे पैसे तसेच आईची पेन्शन आणि नातीसाठी जमवलेले पैसे आणि दोन तोळे वजनाची सोन्याची पोत, एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण पा लाख 22 हजार 400 रुपयांचा कपाटात ठेवला होता मात्र शिवाजीराव पाटील हे परीवारासह 26 फेब्रुवारी रोजी धुळे येथे मुलाकडे गेल्यानंतर शनिवार , 4 मार्च रोजी सकाळी दीपक दगडूलाल जैन यांनी चोरी झाल्याचे कळवल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक कृषिकेश रावले, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !