बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन यांना अ‍ॅक्शन सीन चित्रीत करताना दुखापत


Bollywood star Amitabh Bachchan injured while filming an action scene मुंबई : लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना हैद्राबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचा अ‍ॅक्शन सीन चित्रीत करताना दुखापत झाली आहे. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाल्याने चित्रीकरणही रद्द करण्यात आलं. एआईजी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी तपासणी करण्यात आली.

ट्विट करीत दिली माहिती
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आता मी माझ्या घरी परतलो आहे. जखमी जागेवर पट्टी बांधण्यात आली आहे. शिवाय औषधोपचारही सुरू आहेत. वेदनाही होत आहे. हालचाल करण्यासाठी तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. प्रकृती सुधारण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ लागेल. या गंभीर दुखापतीमुळे माझी इतर कामही सध्या बंद आहेत. पुढे ते म्हणाले, जोपर्यंत मी ठीक होत नाही तोपर्यंत माझं काम बंद राहील. सध्यातरी मी जलसामध्ये) आराम करत आहे. सध्या त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !