मुंबईसह नागपूरात ईडीची 15 ठिकाणी छापेमारी : कोट्यवधींच्या रोकडसह सोने जप्त


ED raids at 15 places in Mumbai and Nagpur: Gold seized with crores of cash मुंबई : ईडीने नागपूरमध्ये एकूण 15 ठिकाणी छापे टाकले असून नागपूरचे अनेक स्टील, लोह आणि रिअल इस्टेट व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर त्यांची चौकशी आणि तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सक्तवसुली संचालनालयाने महाराष्ट्रातील मुंबई, नागपूरमधील सुमारे 15 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर छापेमारी करीत कोट्यवधी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आल्याने या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

15 ठिकाणी शोध मोहिम
सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने मोठी कारवाई केली आहे. पंकज मेहाडिया, लोकेश आणि कथिक जैन यांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकीसंदर्भात ईडीने नागपूर आणि मुंबईतील 15 ठिकाणी शोध मोहिम केली. यादरम्यान 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. दरम्यान, अनेकांची फसवणूक करणार्‍या पंकज मेहाडियाच्या घरावरही छापा टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

व्याजदराचे आमिष दाखवत फसवणूक
दरम्यान, पंकज मेहाडिया नागपुरातील ठग म्हणून ओळखला जातो. व्याजाचे आमिष दाखवून व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा आरोप मेहाडियावर आहे. मेहाडिया यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 2021 मध्ये यांना अटकही करण्यात आली होती. यानंतर ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !