नाशिक खुनाने हादरले : भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या
Nashik shocked by murder : Brutal killing of young man in broad daylight नाशिक : दिंडोरी नाका भागातील अभिषेक स्विटस्समोर हल्लेखोरांनी किरण गुंजाळ (रा. पेठरोड) या युवकाचा भररस्त्यात प्राणघातक शस्त्राने वार करीत निर्घृण खून केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
निर्घृणपणे केली हत्या
हल्लेखोरांनी किरण गुंजाळ याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची मान छाटण्याचा प्रयत्न केला असून त्याच्या छातीत व पोटातही धारदार शस्त्राने वार केले आहे. पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली. अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या रक्तरंजित घटनेने पोलिसांसमोर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणाचे आव्हान उभे राहिले आहे. खुनानंतर पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे, पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, रणजीत नलावडे घटनास्थळी दाखल झाले. मारेकर्यांचा शोध पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

