जळगावातील अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करीत विनयभंग


A minor girl in Jalgaon was molested by indecent behavior जळगाव : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीचा अल्पवयीन मुलाने अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. या प्रकरणी पीडीतेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलाविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शनिपेठ पोलिसात गुन्हा
पीडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित अल्पवयीन मुलाने 14 फेब्रुवारी ते 6 मार्चदरम्यान पाठलाग करीत तिच्याशी अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला तसेच रात्री-बेरात्री तिच्यासोबत मोबाईवर चॅटींगही केले. लग्न नाही केले तर वडीलांना मारेल, अशी मुलीस धमकीदेखील दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रिया रमेश दातीर करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !