बंजारा समाजाच्या होळी उत्सवात अॅड.रोहिणी खडसेंचा सहभाग
मुक्ताईनगर : बंजारा समाजाचा होळी व धुलीवंदन हा मुख्य सण असून मोठ्या उत्साहाने हा समाज हा सण साजरा करतो. कधी काळी तांड्या वस्तीवर गुजराण करणारा बंजारा समाज सध्या आधूनिक प्रवाहात आला असलातरी आधुनिकता आणि तंत्रज्ञानात सुधारणा झाल्यानंतर या समाजातील उत्सव साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे. मुक्ताईनगर तालुक्यात टाकळी, मोरझिरा, धामणगाव, नवीन बोरखेडा, जुने बोरखेडा, जोंधनखेडा, उमरा या गावात बंजारा समाजाची मोठ्या प्रमाणावर वस्ती असून माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गेल्या 30 वर्षांपासून प्रत्येक होळीला या गावांमध्ये जाऊन होळी साजरी करतात. आता त्यांचा हा कित्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अॅड.रोहिणी खडसे यांनी गिरवला आहे.
अॅड.खडसे यांची विविध गावांना भेट
अॅड.रोहिणी यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत धुलिवंदनाच्या दिवशी टाकळी, मोरझिरा, धामणगाव, नवीन बोरखेडा, जुने बोरखेडा, जोंधनखेडा, उमरा या गावात भेट देऊन पारंपरीक बंजारा समाजाचा पेहराव धारण केला व बंजारा समाज भगिनींसोबत नृत्यात सहभागी होऊन होळी व धुलिवंदन उत्सव साजरा केला. होलिकोत्सवा निमित्ताने महिलानी, बंजारा, लेंगी असे वेगवेगळे गीत सादर केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी सभापती विलास धायडे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, कुर्हा येथील सरपंच डॉ.बी.सी.महाजन, जि.प.सदस्य निलेश पाटील, विशाल खोले महाराज, प्रदीप साळुंखे, रवींद्र दांडगे, प्रवीण कांडेलकर, गजानन खिरळकर, रणजीत गोयनका, माणिक पाटील, गोपाळ पाटील, बाळाभाऊ भालशंकर, शिवा पाटील, विशाल रोठे, मुन्ना बोडे, नितेश राठोड, संतोष कांडेलकर, मयुर साठे, सुशील भुते, संदीप पाटील, विष्णू पाटील, चेतन राजपूत आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
