भुसावळात गॅस दरवाढीच्या निषेधार्थ चुलीवर चहा करीत केंद्राचा निषेध

वंचित आघाडीच्या घंटानाद आंदोलनाने वेधले लक्ष : महागाईने जनता होरपळली


Protesting the center by making tea on the stove to protest gas price hike in Bhusawal भुसावळ : महागाईने जनता आधीच होरपळली असतानाच आता गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आल्याने ती मागे घेण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे घंटानाद करीत चुलीवर चहा करत केंद्र सरकारचा प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करून निषेध करण्यात आला. गुरुवारी सकाळी 11 वाजता भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वात पदाधिकार्‍यांनी एकत्र येत चुलीवर चहा बनवत वाढत्या सिलिंडर दरवाढीचा निषेध नोंदवला. सिलिंडर दरवाढ मागे घेण्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

दरवाढ करून दिलासा देण्याची अपेक्षा
केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता होरपळून निघत असून भाजप सरकारचे धोरण जनसामान्यांच्या विरोधात आहेत. केंद्र सरकारने केलेली गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी व जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना अ सोनवणे, माथाडी कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांच्या उपस्थितीत मातीच्या चुलीवर चहा बनवून आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किंमतीत 50 रुपये तर व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 350 रुपये वाढ केल्याने जनतेला मोठी आर्थिक झळ बसणार आहे. आधीच जनता महागाईने होरपळली असून सातत्याने वाढणारा महागाईचा आलेख पाहता दरवाढ कमी करून दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यांचा आंदोलनात सहभाग
जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शिवसेनेचे समाधान महाजन, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, मीरा वानखेडे, बाळा पवार, गणेश इंगळे, गणेश जाधव, देवदत्त मकासरे, मेजर कुणाल सुरडकर, छाया हिरोळे, भारती इंगळे, शेख मिसा, ज्योती गांधी, शोभा तायडे, शैला तायडे, सुमनबाई सुरवाडे, संगीता बिर्‍हाडे, जुयुरीया परवीन, रीना कदम आदींची उपस्थिती होती. दरम्यान, या आंदोलनात शिवसेना उबाठा गटातील समाधान महाजन, संतोष सोनवणे, निलेश महाजन, बबलू बर्‍हाटे, दीपक धांडे, हेमंत खंबायत, गोकुळ बाविस्कर, राजू इंगळे, सोनी ठाकुर , पिंटू भोई, शरद जोहरे, संजय खडसे आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !