यावल शहरात लक्ष्मी नारायण मंदीरात चार दिवस भजन संध्या कार्यक्रम


यावल : शहरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त रंगपंचमी उत्सवानिमित्त चार दिवस भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 13 मार्च या काळात हे कार्यक्रम होतील,

विविध धार्मिक कार्यक्रम
शुक्रवार, 10 मार्च रोजी वहीवाले भजन मंडळ, शनिवार, 11 मार्च रोजी चिरमाडे ताई यांच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम तर रविवार, 12 मार्च रोजी रंगपंचमीला लक्ष्मी नारायण मंदिर भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार, 13 मार्च रोजी राधा राणी भजनी मंडळाचा कार्यक्रम व काल्याच्या प्रसादाने पाच दिवसाच्या भजन संध्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. भजन दररोज रात्री 8.30 ते 10.30 या वेळात कार्यक्रम होतील. धार्मिक कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन पुष्पा सराफ व श्रीकांत सराफ यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !