जळगावच्या विवाहितेचा छळ : भुसावळातील पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Harassment of married woman of Jalgaon : A case has been registered against five people including her husband in Bhusawla जळगाव : जळगाव शहरातील विवाहितेने व्यवसायासाठी दोन लाख रुपये न आणल्याने पतीसह सासरच्यांनी छळ केला. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात गुरुवारी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
छळ असह्य झाल्याने पोलिसात तक्रार
प्रजापत नगरातील माधुरी यांचा भुसावळ येथील आकाश विलास मगरे यांच्याशी विवाह झाला असून लग्नानंतर एक महिना चांगला गेला, त्यानंतर व्यवयास करण्यासाठी माधुरी हिने तिच्या माहेरुन आईकडून दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी वेळावेळी माधुरी हिच्याकडे पतीसह सासरच्यांनी केली तसेच याच कारणावरुन माधुरी हिला वेळोवेळी शिवीगाळ करत मारहाण करुन तसेच जीवे मारण्याची धमकी देत शारीरीक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून माधुरी ह्या जळगावात माहेरी निघून आल्या व त्यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पती आकाश विलास मगरे, सासू संगीता विलास मगरे (दोन्ही रा. तापी नगर, राममंगल, कॉलनी प्लॉट नं.56, भुसावळ), नणंद शिल्पा योगेश बागुल, नंदोई योगेश जगन्नाथ बागुल (दोन्ही रा. भुसावळ) व लहान नणंद मनिषा नितेश पगारे (औरंगाबाद) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल विलास शिंदे हे करीत आहेत.

