पिंप्राळ्यातील एकावर धारदार शस्त्राने हल्ला


Assault with a sharp weapon on one in Pimprala जळगाव : काकाला विनाकारण शिवीगाळ करीत असल्याने पुतण्याने समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतर संशयीताने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना शहरातील पिंप्राळा परीसरातील धनगरवाडा येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता घडली. या प्रकरणी एकाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारण नसताना केला हल्ला
पिंप्राळा परीसरातील धनगरवाडा येथे राजेंद्र रत्न धनगर (55) हे वास्तव्यास असून गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास राजेंद्र धनगर यांच्या काकाला धनगरवाडा भागातील दादू भरत धनगर हा विनाकारण शिवीगाळ करीत असल्याने दादू यास समजविण्यासाठी राजेंद्र धनगर गेल्यानंतर दादू याने धारदार शस्त्राने राजेंद्र यांच्या हातावर वार केला. यानंतर राजेंद्र धनगर व त्यांचा मुलगा नितीन धनगर या दोघांनाही दादू धनगर याने तुम्ही मला बाहेर भेटले तर मी तुम्हाला छाटून टाकेन, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राजेंद्र धनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दादू धनगर याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक विनोद सूर्यवंशी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !