आंतरजिल्हा मोटारसायकल चोरट्यांची टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Gang of inter-district motorcycle thieves in crime branch’s net पुणे : जुन्नर विभागातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्यांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 10 लाख रुपयांच्या 29 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. अटकेतील आरोपींमध्ये अमोल मधे (रा. वाघवाडी, जि. नगर), विजय मधे (रा. निमदरी , जि. नगर), संतोष मधे (रा. केळेवाडी , जि. नगर), संदीप मधे, (रा. केळेवाडी, जि. नगर), विकास मधे (रा. पवळदरा मधेवस्ती पोखरी, जि. नगर), विजय जाधव (रा. कुरकुंडी, जि. नगर), सुनील मेंगाळ (रा. धरणमळई वाडी, ता. संगमनेर), भारत मेंगाळ (रा. गारोळे पठार, जि अ. नगर), मयूर मेंगाळ (रा. आंबीदुमाला, जि. नगर) यांचा समावेश आहे.
जांबूत फाटा भागातून अटक
गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील आंतरजिल्हा टोळीच्या मुख्य दोन म्होरक्यांसह नऊ जणांना जांबूत फाटा परिसरातून ताब्यात घेतले. पुणे ग्रामीण अहमदनगर, ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे व घरफोडी चोरीचे असे एकूण 26 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या टोळीकडून एकूण 10 लाख रुपये किमतीच्या 29 मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. या आरोपींना नारायणगाव आणि ओतूर ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपींकडून नारायणगाव 4, घोडेगाव 5, ओतूर 3, जुन्नर 3, मंचर 2, खेड 2, रांजणगाव 1 शिरूर 1, अकोले 2, आश्वी 1, लोणी 1, टोकावडे 1 असे एकूण 26 गुन्हे उघडकीस आले असून एकूण 33 घटना उघडकीस आलेल्या आहेत.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, महादेव शेलार, गणेश जगदाळे, तुषार पंदारे, दीपक साबळे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, मंगेश थिगळे, राजू मोमीण, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, संदीप वारे, अक्षय नवले, चासफी मुकुंद कदम, अक्षय सुपे यांनी केली.
