कुर्हा येथे देशी-विदेशी दारूची अवैध विक्री : गुन्हे शाखेच्या कारवाईने खळबळ
Illegal sale of domestic and foreign liquor in Kurha : Crime branch’s action stirs up excitement कुर्हा : गावातील हॉटेल खुशी येथे देशी-विदेशी कंपनीच्या दारूची अवैधरीत्या विक्री सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने छापेमारी करीत सुमारे 38 हजारांचा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईने हॉटेलमध्ये अवैधरीत्या मद्य विक्री करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल खुशी येथे पथकाने छापा टाकून विनापरवाना अवैधरीत्या दारू विक्री करताना दिनेश गंगाप्रसाद जैस्वाल यास पकडण्यात आले. हॉटेलमधून 38 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देशी कंपनीच्या व विदेशी कंपनीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस नाईक किरण मोहन धनगर, पोलीस नाईक प्रमोद अरुण लाडवंजारी, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख व चालक प्रमोद शिवाजी ठाकूर व कुर्हा दुरक्षेत्राचे पोलीस नाईक प्रदीप इंगळे आदींच्या पथकाने केली कारवाई केली.

