चिंचखेडा खुर्दला कारवाईच्या रागातून महिलांनी घर पेटवले : दोघांविरोधात गुन्हा
Chinchkheda Khurdla Women set house on fire out of anger against action: Crime against two कुर्हा : येथूनच जवळ असलेल्या चिंचखेडा खुर्द येथे रविवार, 12 रोजी दोन महिलांनी घराला आग लागल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, कपाटासह गाधी, कुलर व संसारोपयोगी वस्तू जळाल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गावातील दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांवर आग लावल्याचा संशय
तालुक्यातील चिंचखेडा येथे रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पद्मिनी नारायण पाटील यांच्या घराला आग लागली तर पाटील यांनी केलेल्या आरोपानुसार संशयित उषा निवृत्ती मेनकार (कोळी), सिंधूबाई सुपडू मेनकार यांनी आपल्या घराला आग लावल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी रंग पंचमीच्या दिवशी शुभम नारायण पाटील यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर त्यांच्या पतीवर कारवाई झाल्याचा राग संबंधिताना होता व यापूर्वी त्यांनी शिविगाळ करीत घराला आग लावेल, अशी धमकी देत प्रत्यक्षात ती खरी केल्याचा आरोप पद्मिनी पाटील यांनी केला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.

