भुसावळात मरीमातेच्या जयघोषात ओढल्या बारागाड्या


Chariots drawn in Bhusawal to the cheers of Marimata भुसावळ : शहरातील गंगाराम प्लॉट पोस्ट ऑफिस परीसरात रविवारी रंगपंचमीला सालाबादप्रमाणे मरीमाता यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने भाविकांनी मरीमातेच्या जयघोषात बारागाड्या ओढल्या. यात्रोत्सवात खेळण्यांच्या दुकानांसह संसारोपयोगी साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती.

50 वर्षांची परंपरा कायम
शहरातील गंगाराम प्लॉट भागातील मरीमाता यात्रोत्सवात मंगळवारी बारागाड्या ओढण्यात आल्या. सुमारे 50 वर्षांपूर्वी भगत स्व.शंकर चिमण पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा यात्रोत्सवाची परंपरा सुरू आहे. यंदाही सालाबादप्रमाणे हा यात्रोत्सव निविर्घ्नपणे पार पडला. सायंकाळी भगत हरीश लोखंडे तर बगले निलेश पाटील, विनायक झोपे यांनी बारागाड्या ओढल्या. आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते बारागाड्यांचे पूजन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, एकनाथ पाटील, किरण पाटील, किशोर पाटील, किरण कोलते, प्रा.सुनील नेवे, अशोक चौधरी, दीपा ठाके, व्यापारी शाम दरगड, प्रशांत देवकर, बंडू पाटील, संजय पाटील, सुनील पाटील, नीलेश पाटील, रीतेश बर्‍हाटे, मरिमाता मंदिर ट्रस्टचेे पदाधिकारी व गंगाराम प्लॉट मित्र परीवाराने सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !