भुसावळात बिसारा लेडीज इक्वलिटी रनमध्ये धावल्या 627 रणरागिणी
स्पर्धेतून पर्यावरणासह आरोग्याचा जागर : स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचा उपक्रम
627 female warriors ran in Bisara Ladies Equality Run in Bhusawal भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे लेडीज इकॉलिटी रन चे आयोजन करण्यात आले. यात तब्बल 627 महिलांनी सहभाग नोंदविला. 3 किमी, 5 किमी व 10 किलोमीटर अंतरासाठी स्पर्धा पार पडली. पहाटे सहा वाजता 10 किमी, 6.20 वाजता पाच किमी व 6.40 वाजता तीन किलोमीटर अंतराच्या स्पर्धेस रेल्वे क्रिडांगणावरून सुरुवात करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, रम्या कन्नन, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, बढे फॅपिटल्सच्या संचालिका तृप्ती बढे, हॉटेल मल्हारचे संचालक प्रमोद धनगर, न्यूट्रीमॅक्सचे राहुल पाटील, बी.एम.ज्वेलर्सच्या दीपा अग्रवाल, रेस संचालक प्रवीण फालक उपस्थित आदींची उपस्थिती होती. या रेसमध्ये पोलीस अधीक्षकांच्या पत्नी रम्या कन्नन यांनी स्वतः 10 किमी धावून महिलांचा उत्साह वाढविला.
धावपटूंवर पुष्पवृष्टी करीत स्वागत
भुसावळकरांनी धावपटूंवर पुष्पवृष्टी करीत त्यांचा उत्साह वाढवला टाळ्यांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या आवाजात व काही ठिकाणी बँड व लेझीमदारे धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी ठिकठिकाणी विद्यार्थी, स्वयंसेवक, शाळा-महाविद्यालयांचे
व सेवाभावी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, टेमानी डी.एल.हिंदी स्कूलच्या स्काईड-गाईड व एनसीसीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, भुसावळ हायस्कूलचे विद्यार्थी, रेल्वेचा एमओएच विभाग, लॉयन्स क्लबचे पदाधिकारी, एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बँड पथक व विद्यार्थिनीचे लेझीम पथक विशेष लक्ष वेधून घेत होते. आयोजकांतर्फे ठिकठिकाणी घावपटूंसाठी पेयजल, पाणी, बिस्कीट, चॉकलेट, एनर्जी ड्रिंक ची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ.तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनात रुग्णवाहिका व फिरते मेडीकल सपोर्ट सिस्टिम उपलब्ध होती. याशिवाय ब्रिजेश लाहोटी, रणजित खरारे व सचिन अग्रवाल आपल्या शेकडो धावपटू व सायकलपटूंसह व पोलीस विभागाच्या सहायाने रहदारीचे नियमन करीत होते. सर्व धावपटु क्रिडांगणावर परतल्यावर कौस्तुभ मंत्री यांनी स्ट्रेचिंग एक्सरसाईज घेतली. त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमास सुरुवात झाली व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत प्रवीण वारके, डॉ.नीलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले.

स्पर्धेतील विजेते असे
पाच किलोमीटर (वयोगट 12 ते 40) : जान्हवी रोझोदे (प्रथम), शिवानी पाटील (द्वितीय), छाया ढोले (तृतीय), (वयोगट 41 पेक्षा अधिक) : शैला भारंबे- प्रथम, सुनीता सिंग- द्वितीय, डॉ.सीमा पाटील- तृतीय, 10 किमी (वयोगट 16 ते 40 वर्षे)- अश्विनी काटोले -प्रथम, डॉ.अर्चना काबरा- द्वितीय, धनस्री चौधरी- तृतीय (वयोगट 41 पेक्षा अधिक)- डॉ.रती महाजन- प्रथम, दीपा स्वामी- द्वितीय, वैशाली बडगुजर- तृतीय
