भुसावळातील स्नेहयात्री राज्यस्तरीय करंडक एकांकिका स्पर्धेत ‘ओल्या भिंती’ प्रथम
नाशिकचे ‘हार्ले क्वीन’ व्दितीय तर नाट्यरंग जळगावचे ‘दान पावलं’ तृतीय
Snehayatri in Bhusawal state level trophy one piece competition ‘Olya Varaya’ first भुसावळ :स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे शहरातील श्रीकृष्णचंद्र सभागृहात शनिवार व रविवारी दोन दिवसीय राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. एकांकिका स्पर्धेत कलासक्त, मुंबई या संस्थेच्या ‘ओल्या भिंती’ या एकांकिकेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले तर सौ.स्मिता हिरे कॉलेज, नाशिकच्या ‘हार्ले क्वीन’ या एकांकिकेला द्वितीय तर जळगावच्या नाट्यरंग थिएटरच्या ‘दान पावलं’ या एकांकिकेला तृतीय क्रमांक आणि डावा क्रिएशन्स, मुंबईच्या ‘मेन इन ब्लॅक’ या एकांकिकेने उत्तेजनार्थ पारीतोषिक पटकावले.
विजेत्या संघांनी केला जल्लोष
स्व.लालचंद लखीचंद निमाणी यांच्या स्मरणार्थ जय व देवेंद्र निमाणी यांच्याहस्ते प्रथम क्रमांकाचे 11 हजारांचे रोख पारीतोषिक, हॉटेल मल्हारचे संचालक प्रमोद धनगर यांच्याकडून रुपये सात हजारांचे व्दितीय तर ज्येष्ठ रंगकर्मी वसंत विनायक देवळालकर यांच्यातर्फे रुपये चार हजारांचे तृतीय व अजय पाटील यांच्याकडून उत्तेजनार्थ पारीतोषिके देण्यात आली. याप्रसंगी आतिषबाजी करुन प्रत्येक विजेत्या संघांचा मोठ्या जल्लोषात गौरव करण्यात आला.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी यांची उपस्थिती
समारोपप्रसंगी आमदार संजय सावकारे, माजी नगरसेवक युवराज लोणारी, निलेश रायपुरे, प्रमोद धनगर, जय निमाणी, देवेंद्र निमाणी, हास्यजत्रा फेम अभिनेते हेमंत पाटील, रमा राघव मालिकेतील आशिष कुलकर्णी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.जयेंद्र लेकुरवाळे तर सुत्रसंचलन प्रा.गिरीष कुलकर्णी यांनी केले.
हास्यजत्रा फेम जळगावचे ‘हेमंत पाटील’ यांचा स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे ‘रंगसेवा पुरस्कार 2023’ देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र पाटील आणि सचिव विश्वजीत घुले यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेहयात्री प्रतिष्ठान या नाट्यसंस्थेत घडलेल्या अबोली मालिका फेम तुषार जोशी आणि रमा-राघव मालिका फेम आशिष कुलकर्णी यांचा देखील स्नेहयात्रीतर्फे सत्कार करण्यात आला. स्नेहरंग या रंगारंग कार्यक्रमाचे दमदार सादरीकरण निन्जा कोडर्स हबच्या विद्यार्थीनी आणि नुपूर कथ्थक डान्स अकादमीच्या कलावंतांनी एकापेक्षा एक दर्जेदार नृत्य सादर केले तर विशाल वानखेडे याने विविध नकला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी मानसी पाटील आणि रमाकांत भालेराव यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचा निकाल असा- दिग्दर्शन- योगेश कदम (प्रथम), रोहित सरोदे/सतीश वराडे (व्दितीय), अमोल ठाकूर (तृतीय)
अभिनय- सतीश वराडे (प्रथम), अमोल ठाकूर (व्दितीय), अनिकेत ठाकूर (तृतीय)
स्त्री अभिनय- राजश्री जमदाडे (प्रथम), डॉ.जुईली टेमकर (व्दितीय), पायल जाधव (तृतीय)
नेपथ्य- आशिष पवार (प्रथम), विनय गोडे (व्दितीय), प्रथमेश पाटील/अविनाश सांबर (तृतीय)
प्रकाशयोजना – शाम चव्हाण (प्रथम), प्रणव सपकाळे (व्दितीय), नितीन सावळे (तृतीय). पारीतोषिकांसाठी रवींद्र निमाणी, प्रमोद धनगर, वसंत देवळालकर, गिरीष कुलकर्णी, जयेंद्र लेकुरवाळे, राजेंद्र जावळे, विश्वजीत घुले, प्रशांत पाटील, राजेश पाटील, मानसी पाटील, आदर्श पंडा, अजय पाटील यांचे सहकार्य लाभले.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
यशस्वीतेसाठी रामचंद्र डहाके, नारायण माळी, संजय यावलकर, प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी, धनराज कुवर, राजेश पाटील, हरीश कोळी, आदर्श पंडा, प्रशांत पाटील, मानसी पाटील, समृध्दी पाटील, नितीश पाटील, नवरत्न डहाके, तुषार जोशी, भारती वैष्णव, अजय पाटील, रोहन माळी, संजीवनी यावलकर, रीतेश वानखडे, खुशाल निंबाळे, मयुरेश कुळकर्णी आदींनी परीश्रम घेतले.
