लग्नाचे वचन देत दोन तरुणींवर बलात्कार : या शहरातील धक्कादायक घटना
In Chhatrapati Sambhaji Nagar, two young women were raped with the lure of marriage छत्रपती संभाजीनगर : राज्यातील तरुणींवर अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. छत्रपती संभाजीनगरातही दोन तरुणींवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आल्याची बाब समोर आली असून या प्रकरणी छावणी व उस्मानपुरा पोलिस ठाण्यात 13 मार्च रोजी दाखल करण्यात आला.
लग्नाच्या आमिषाने वारंवार अत्याचार
पहिली अत्याचाराची घटना पडेगाव भागात घडली. ईश्वर एकनाथ साळवे (रा. पडेगाव, सप्तश्रृंगी) याने ब्युटीपार्लरचा व्यवसाय करणार्या तरुणीला 2019 पासून लग्न करण्याचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केले. मागील काही दिवसांपासून तो लग्नासाठी टाळाटाळ करीत होता. 12 मार्च रोजी पीडिता आरोपी ईश्वर यास लग्नाविषयी विचारण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिला ईश्वरसह त्याची आईसह सहा बहिणींनी बेदम मारहाण केली. त्यामुळे पीडितेने थेट छावणी पोलिस ठाणे गाठत सर्वांच्या विरोधात तक्रार नोंदवली. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक पांडुरंग डाके करीत आहेत.

उस्मानपूरा हद्दीतही अत्याचार
दुसरी घटना उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. तेवीस वर्षीय तरुणीला स्वप्नील दिपक खंकाळ (27, रा. सिद्धार्थनगर, करकंब, ता. पंढरपुर, जि. सोलापुर) या युवकाने मे 2022 पासून लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. पीडितेने लग्नाची मागणी केल्यानंतर आरोपी स्वप्नील खंकाळ याच्यासह रोहित शिवशरण (रा. पंढरपुर, जि. सोलापुर) या दोघांनी तिच्या एक महिन्याच्या मुलीला पळवून नेले. तेव्हा पीडितेने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर दोन्ही आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.