लग्नावरून परतणार्या जळगावातील महिलेचा चक्कर येवून पडल्याने मृत्यू
A woman in Jalgaon who was returning from a wedding died due to dizziness नशिराबाद : भावासोबत सावदा येथे लग्नासाठी गेल्यानंतर परतीच्या प्रवासात दुचाकीवरून जळगावकडे निघालेल्या बहिणीचा चक्कर येवून रस्त्यावर पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुमती गंभीर तेलंगे (62, जोशीवाडा, मेहरुण, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
सुमती या आपल्या भावासोबत सावदा येथे लग्नासाठी गेल्या होत्या व परतीच्या प्रवासात नशिराबाद हद्दीतील साकेगाव गावाच्या पुढे त्यांना अचानक चक्कर आला व त्या जमिनीवर पडल्याने त्यांना गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले. पायास व कंबरेस मार लागल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान 18 फेबुवारी मृत्यू झाला. याबाबतची कागदपत्रे नशिराबाद पोलिसांना सोमवारी प्राप्त झाल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार युनूस शेख करीत आहेत.


