जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयाबाहेर दरपत्रक न लावणार्या रुग्णालयांवर कारवाई करा
भुसावळातील दिनेश उपाध्याय यांची शासनाकडे तक्रार : रुग्णालयांकडून नियम धाब्यावर
Take action against hospitals that do not post tariff outside every hospital in the district भुसावळ : जळगाव जिल्हयातील प्रत्येक खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शणी भागात लावणे कायद्याने बंधनकारक असलातरी रुग्णालयांनी हा नियम धाब्यावर बसवल्याने या संदर्भात भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांनी शासनाकडे तक्रार केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जुन 2019 मध्ये सर्व राज्यांमध्ये रुग्ण हक्काची सनद खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये दर्शणी भागात लावण्याचे आदेश जारी केले व राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने सप्टेंबर 2020 आणि मे 2021 मध्ये या विषयी आदेश निर्गमित केले आहेत. कोरोना काळातील खाजगी रुग्णालयांमधील गैरप्रकार व रुग्णांचे झालेले शोषण आदीची दखल सरकारणे घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना आदेश दिले होते.
आदेश न पाळणार्या रुग्णालयांवर व्हावी कारवाई
रुग्ण हक्काच्या सनदमध्ये रुग्नाला प्राप्त असलेले अधिकार, आजाराच्या प्रकाराची माहिती मिळण्याचा हक्क, तपासण्यांचे तपशील, उपचारांचे परीणाम, अपेक्षित खर्च, तपासण्यांचे अहवाल व सविस्तर बिले मिळण्याचा हक्क या सारखे अनेक रुग्ण हक्काचा सदर सनदीत समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खाजगी रुग्णालयात 15 दिवसांच्या आत रुग्ण हक्कांची सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती तात्काळ दर्शणी भागात लावण्यात यावी व त्या बाबतचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश निर्गमित करावेत तसेच सदर आदेशाचे पालन न करणार्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणीपंडित दिनेश शंकरलाल उपाध्याय यांनी केली आहे.