जिल्हा न्यायालयाच्या आवारात विवाहितेचा विनयभंग : पतीसह दोघांविरोधात गुन्हा
molestation of spouse in district court premises : Crime against both husband and wife जळगाव : कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी दाखल गुन्ह्यात जळगाव शहरातील जिल्हा न्यायालयात आलेल्या शहरातील एका विवाहितेचा पतीसह दोघांनी अश्लीत हातवारे करून शिविगाळ करीत विनयभंग केला. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीसह दोघांविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी विवाहिता वास्तव्यास असून कौटुंबिक वादाबाबत तिने न्यायालयात तक्रार केली असून केसच्या तारखेवर मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास विवाहिता ही जिल्हा न्यायालयात आली असता न्यायलायाच्या आवारात विवाहितेचा पती व त्याच्यासोबतच्या एकएने विवाहितेला अश्लिल हातवारे करत तसेच अश्लिल शिवीगाळ करत विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले, याबाबत विवाहितेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून शिवानंद संग्रामसिंग बुट्टे पाटील व अमेय अरुण जाधव (दोन्ही रा.औंध, जि.ठाणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक दिलीप सीताराम पाटील करीत आहेत.