भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील तरुण कर्मचार्‍याचा कर्तव्यावरच हृदयविकाराने मृत्यू


A young employee of Bhusawal city police station died of heart attack while on duty भुसावळ :   भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील 32 वर्षीय तरुण कर्मचार्‍याचा कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेने पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे. सागर दिलीप देहाडे (32, जळगाव) असे मयत कर्मचार्‍याचे नाव आहे.

कर्तव्यावर असतानाच ओढवला मृत्यू
जळगाव येथे वास्तव्यास असलेला मात्र शहर पोलीस ठाण्यात प्रथमच नियुक्ती मिळालेला सागर देहाडे याने बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात हजेरी लावली व समन्स बजावणीसाठी निघाल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागल्याने ही बाब त्याने सहकार्‍याला सांगितल्यानंतर त्यास ट्रामा केअर सेंटरला नेण्यात आले येथे त्याचा डॉ.मयूर चौधरी यांनी ईसीजी काढला मात्र हृदयविकाराचा मोठा झटका आल्याने डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेजमध्ये हलवत असतानाच त्याचा मृत्यू ओढवला.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुण पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याने पोलीस वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. मयत सागरच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !