करंंजी गावातील अल्पवयीन तरुणीचा विनयभंग


भुसावळ : बोदवड तालुक्यातील करंजी गावातील अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाविरोधात गुन्हा
अल्पवयीन पीडीतेच्या तक्रारीनुसार, संशयित डिगंबर कैलास पाटील (करंजी) याने बुधवारी दुपारी साडेचार वाजता पीडीता ही काकांच्या गच्चीवर उभी असताना हात पकडत विनयभंग केला तसेच माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या आई-वडिलांसह भावाला ठार मारेल, अशी धमकी दिली. तपास उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !