वीज तारांवर आकोडे टाकून वीज चोरी : दहिगावच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


Electricity theft by putting cords on electricity wires: A case has been registered against two people from Dahigaon यावल : तालुक्यातील दहिगाव या गावात विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरट्यांविरोधात मोहिम राबवण्यात आली. यात गावात दोन जण विद्युत वाहिनीवर आकोडे टाकून वीज चोरी करतांना आढळल्याने उभयंतांना दंड संदर्भात नोटीस बजावण्यात आली मात्र त्यांनी दंड न भरल्याने दोघांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दंड न भरल्याने अखेर गुन्हा
दहिगाव येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता जितेंद्र कमलाकर धांडे यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ते दहिगाव गावात आपल्या पथकासह वीज चोरी विरुद्ध मोहिम राबवत असताना रमेश नथ्थु पाटील व काळू शिवराम पाटील हे वीज चोरी करतांना आढळल्याने रमेश पाटील यांना 16 हजार 253 रुपये व काळू पाटील यांना 3 हजार 491 रुपये दंडाची नोटीस देण्यात आली मात्र दोघांनी दंड भरला नाही. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !