भुसावळातील हद्दपार आरोपी जितू भालेरावला अटक : चाकूही केला जप्त


Deported accused Jitu Bhalerao arrested in Bhusawal : knife also seized भुसावळ : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या जितू शरद भालेराव (27) हा शहरात चाकूच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास शहर पोलिसांनी अटक केली. संशयीतांकडून लोखंडी चाकू जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
जितू भालेराव यास जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून तो भोईनगर, टेक्नीकल हायस्कूल भागात आल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत त्यास ताब्यात घेतले तसेच त्याच्याकडील नऊ इंच लांबीचा चाकू जप्त करण्यात आला. या प्रकरणी कॉन्स्टेबल भूषण लिलाधर चौधरी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय मोहम्मद अली सैय्यद करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !