भुसावळ तालुक्यात अवकाळी वादळाने गव्हासह कांदा व मक्याला फटका


In Bhusawal taluka unseasonal storm hit wheat, onion and maize भुसावळ : शहरासह तालुक्यातील अनेक भागात बुधवारी रात्री अवकाळी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी दिल्याने गव्हासह मका व कांद्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. आधीच कांद्याला भाव नसताना झालेल्या नुकसानीमुळे कांदा उत्पादकांवर मोठे संकट कोसळले आहे त्यातच राज्य कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने व त्यात कृषी, महसूलचे कर्मचारी सहभागी पंचनामे करण्यास आता पुन्हा दिरंगाई होणार असल्याने शेतकर्‍यांवर दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.

वीज गुल, पिकांना फटका
शहरात मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍याला सुरूवात झाली तर पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी पाऊस बरसला तर तालुक्यातील अनेक भागात वादळी वार्‍याने मक्यासह गव्हाच्या पिकाला फटका बसला. भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा, ओझरखेडा, साकेगाव, वांंजोळा, साकरी, सावतर येथील शेतकर्‍यांच्या शेतातील गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, राज्य कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने यात कृषी विभाग व महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक हे सामील झाल्याने पंचनामे करण्यास दिरंगाई होणार असल्याने नुकसानीचा आकडादेखील तो पर्यंत कळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. कृषी विभागाचे तीन पर्यवेक्षक कामावर असल्याने ते शेतात जात असून नुकसानीची नोंद करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !