अरे देवा ! : घराबाहेर ठेवलेल्या चावी कुलूप उघडत चोरट्यांनी शिरसाळेत 62 हजारांच्या ऐवजावर मारला डल्ला


A locked house was broken into in Shirsale village and jewels along with cash were stolen अमळनेर : चोरट्यांनी घराबाहेर ठेवलेल्या चावीने घराचे कुलूप उघडत कपाटातून 62 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना अमळनरे तालुक्यातील शिरसाळे येथे घडली. या प्रकरणी गुरूवारी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चावी बाहेर ठेवल्याची साधली संधी
अमळनेर तालुक्यातील शिरसाळे गावात भटू शिवदास पाटील (50) हे शेतकरी वास्तव्यास आहेत. बुधवार, 15 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने बाहेर ठेवलेल्या चावीने दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटातून 50 हजारांची रोकड तसेच 12 हजारांचे दागिने असा एकूण 62 हजारांचा ऐवज लांबवला. भटू पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर गुरुवारी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार भरत ईशी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !