यावलला मुलीची बदनामीच्या कारणातून दंगल : दोन गटातील 14 जणांविरूध्द गुन्हा
Riot due to defamation of Yavala girl: Crime against 14 persons from two groups यावल : शहरातील विरार नगर भागात मुलीची बदनामी करीत असल्याच्या संशयावरून एका कुटुंबाला सहा जणांनी लाकडी दांडा व दगड घेऊन मारहाण केली तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका गटाकडून सहा जणांविरुद्ध तर दुसर्या गटाकडून 8 अशा एकुण 14 जणांविरूध्द दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
एका गटाच्या सहा जणांविरोधात गुन्हा
यावल शहरात फैजपूर रस्त्यालगत विरारनगर असून या भागातील नसरीन मुस्ताक पटेल यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आपल्या मुलीची बदनामी करत असल्याचे संशयावरून याच भागातील रहिवासी पप्पू छोटू पटेल यांनी व आमीन रज्जाक पटेल, रफिक रज्जाक पटेल, रज्जाक शकुर पटेल, छन्नो रज्जाक पटेल व टीना अनिस पटेल या सहा जणांनी नसरीन पटेल सह त्यांचे पती, मुलगा व पुतण्या अशांना हातात लाकडी दांडा घेऊन शिवीगाळ करून मारहाण केली तर पप्पू पटेल याने अंगातील कपडे काढून नसरीन पटेल यांच्या कुटुंबास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सहा जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.
दुसर्या गटाच्या तक्रारीवरून आठ जणांविरूध्द गुन्हा
दुसर्या गटातर्फे विरार नगर भागातील छन्नो रज्जाक पटेल यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित या आपल्या सुनेला शिविगाळ करीत होत्या व त्या आपल्याला शिविगाळ करीत असल्याच्या संशयावरून रज्जाक ईसामु पटेल, नियाज अहमद हिलाल पटेल, गुड्डू राज्जाक पटेल, अरबाज रज्जाक पटेल, मुस्ताक इसामु पटेल, बाबा मुस्ताक पटेल, नसरीन मुस्ताक पटेल, हिना हिलाल पाटील (सर्व रा. विरारनगर) या आठ जणांनी छन्नो पटेल यांना मारहाण केली, लाकडीने दांड्याने दुखापत केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला.