चाळीसगाव रेल्वे स्थानकावर अनोळखीचा मृत्यू


भुसावळ : चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक एकवरील आरपीएफ कार्यालयामागे 2 जानेवारी रोजी 30 ते 35 वर्षीय अनोळखीचा मृत्यू झाला. उंची पाच फूट चार इंच, रंग काळा-सावळा, शरीर बांधा सडपातळ, चेहरा लांबट, केस काळे व कुरळे, काळी-पांढरी वाढलेली दाढी तसेच मनगटात पांढर्‍या रंगाचा दोरा व अंगात बारीक चौकडी असलेला फुल बाहिचा शर्ट तसेच पांढर्‍या मळकट सॅण्डो बनियान व राखाडी रंगाची काळी लाईनिंग असलेली चौकडीची फुल पँट आहे. ओळख पटत असल्यास हवालदार प्रकाश चौधरी यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.


कॉपी करू नका.