तरुणाच्या खुनाने पहूर हादरले
डोक्यात दगड टाकून केली हत्या : ओळख पटवण्याचे आवाहन
Pahor was shaken by the murder of the young man पहूर : शहरापासून काही अंतरावरील एका शेतात 30 ते 35 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड टाकून निघर्र्ृण हत्या करण्यात आल्याची बाब मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने शहरासह परीसरात खळबळ उडाली आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसल्याने पहूर पोलिसांकडून मयताची ओळख पटण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डोक्यात दगड टाकून केली हत्या
पहुर-जामनेर रस्त्यावरील एका शेतात तरुणाची डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली असून याबाबतची माहिती पहूर पोलिसांना कळताच दुपारी चार वाजता पोलिस निरीक्षक प्रताप इंगळेंसह कर्मचार्यांनी धाव घेतली. मयताची सुरूवातीला पोलिसांकडून ओळख पटवण्यात येत असून त्यानंतर मारेकरी निष्पन्न होणार आहे. युवकाच्या खुनामुळे मात्र या परीसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.