अज्ञात वाहनाची धडक : जळगावातील महिलेचा मृत्यू


Collision with unknown vehicle : Death of a woman in Jalgaon जळगाव : शहरातील वाघ नगरातील महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रतिभा पिंटू ठाकरे (38, वाघ नगर, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.

अखेर प्राणज्योत मालवली
जळगाव शहरातील वाघ नगर परीसरातील प्रतिभा ठाकरे या सोमवार, 13 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बांभोरी गावाजवळील जैन इरीगेशन कंपनीजवळून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना उडवल्याने प्रतिभा ठाकरे ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर जळगाव शहरातील छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असता दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सोनी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !