ओव्हरटेक करताना दुचाकी धडकल्या : अमळनेरचे दोघे जखमी
Two wheelers collided while overtaking : Two injured from Amalner अमळनेर : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकीने समोरून येणार्या दुचाकीला धडक दिल्याने अमळनेर येथे दुचाकीस्वार जखमी झाले. या प्रकरणी सोमवारी मारवड पोलिसात अंतुर्लीच्या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकीचे नुकसान : दोघे जखमी
विजय बाबूलाल पाटील (42, हिंगोणे) हे गावातील भिकन रसुल पिंजारी (अमळनेर) यांच्यासोबत सोमवार, 20 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच.19 ए.एस.5085) ने अमळनेर येथून हिंगोणेकडे येत असताना समोरून कारला ओव्हरटेक करत येत असलेली दुचाकी (एम.एच.19 ए.4689) ने जोरदार धडक दिल्याने पाटील यांच्यासह पिंजारी जखमी झाले तर दुचाकीही नुकसान झाले. दोघांना तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीधारक जयेश बाळू पाटील (अंतुर्ली ता.अमळनेर) याच्या विरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय पाटील करीत आहे.