वीज कंपनीच्या 30 हजारांच्या तारा चोरट्यांनी लांबवल्या


30 thousand wires of the electricity company were extended by thieves अमळनेर : वीज महावितरण कंपनीच्या मालकीच्या ट्रान्सफार्मरसह अ‍ॅल्युमिनिअमच्या सुमारे 30 हजार रुपये किंमतीच्या तारा अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी शिवारातील शेतातून चोरीला गेल्या. सोमवारी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी शिवारात असलेले नागराज हिलाल गुजर यांच्या शेताजवळ महावितरण कंपनीच्या मालकीचे ट्रान्सफार्मर आणि अ‍ॅल्युमिनियमच्या तारा ठेवण्यात आल्याने चोरट्यांनी संधी साधत 17 रोजीच्या सायंकाळी 6 ते 18 मार्चच्या सकाळी 8 वाजेच्या दरम्यान ट्रान्सफार्मरसह विद्युत तारा शेतातून लांबवल्या. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर जानवे येथील महावितरण कंपनीचे वरीष्ठ तंत्रज्ञ संदीप आधार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली व चोरी झाल्याचे उघड झाल्यानंतर सोमवारी अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक हितेश चिंचोरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !