जळगावातील दशरथ नगरात घरफोडी : सव्वा लाखांचा ऐवज चोरीला


Burglary in Jalgaon’s Dashrath Nagar: A quarter of a lakh was stolen जळगाव : शहरातील दशरथ नगरातील बंद घरातून चोरट्यांनी एक लाख 19 हजारांचा ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली आहे. शनीपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

चोर्‍या-घरफोड्या वाढल्या
विपूल दिलीप भारंबे (32, रा.दशरथ नगर, जळगाव) हे कुटूंबासह कामानिमित्त गावाला गेल्यानंतर घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी 11 ते 18 मार्च दरम्यान केव्हातरी साधली. चोरट्यांनी बेडरूमच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, दहा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे तुकडे, 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लटकन, 21 हजार रुपये किंमतीचे कानातील लटकन असा एकूण एक लाख 19 हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. भारंबे हे शनिवार, 18 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. विपुल भारंबे यांनी सोमवारी दुपारी एक वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !