पंतप्रधानांच्या आडनावावरून केलेली टिका भोवली : राहुल गांधींना दोन वर्ष शिक्षा


Criticism made on Prime Minister’s surname Bhovali : Rahul Gandhi sentenced to two years अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टिकेप्रकरणी सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत त्यांना दोन वर्ष शिक्षा सुनावणी आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा प्रचारावेळी मोदींवर टीका करताना सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय? असा सवाल केला होता. याविरोधात गुजरातमधील मोदी समाजाने राहुल गांधींवर खटला दाखल केला होता. सुरतच्या सीजेएम कोर्टाने गुरुवारी सकाळी 11 वाजता आपला निर्णय दिला आहे.

मानहानीचा दावा होता दाखल
राहुल गांधी आज या कोर्टात पोहोचले होते. यावेळी कोर्टाने राहुल गांधींना तुम्हाला यावर काही सांगायचे आहे का असे विचारले. यावेळी राहुल यांनी मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही, असे सांगितले. सुरतच्या जिल्हा सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता.

शिक्षेनंतर जामिनावर सुटका
या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने आयपीसीच्या कलम 504 अन्वये मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवले. आयपीसीच्या कलम 504 मध्ये दोषी आढळल्यास दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. न्यायालयाने निर्णय जाहीर केला असून राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल यांना लगेचच जामिनही दिला आहे.


कॉपी करू नका.