एरंडोलमध्ये किराणा दुकान फोडले : 12 हजारांचा किराणा लंपास

काजू-बदामासह साबणांवर चोरट्यांनी मारला डल्ला
एरंडोल : शहरातील आठवडे बाजारातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्समधील किराणा दुकानातून चोरट्यांनी सुमारे 12 हजारांच्या किराणा सामानावर डल्ला मारल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. राजेंद्र बिर्ला यांच्या मालकिचे हे दुकान असून चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूचे शटर उचकावून दुकान प्रवेश करीत 600 रुपयांची चिल्लर, सुमारे तीन हजारांचे विविध कंपनीचे साबण, काजू, बदाम, अगरबत्ती असा एकूण 10 ते 12 हजारांचा मुद्देमाल लांबवला. पहाटे घटना उघडकीस आल्यानंतर एरंडोल पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली. दरम्यान, चोरीमुळे व्यावसायीकांमध्ये भीती पसरली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.


