यावल पालिकेच्या सभेत 16 विषयांना मंजुरी


यावल : यावल नगरपालिकेच्या विशेष सभेत सोमवारी शहर विकासाच्या 16 विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेत पालिकेने आरक्षित केलेल्या क्रीडांगणासाठी एक कोटी 52 लाख रुपये मोजले मात्र ती जागा अद्यापही पालिकेने ताब्यात न घेतल्यामुळे नगरसेवक अतुल पाटील यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला तसेच तिथे क्रीडांगण आताच करणे शक्य नसेलतरी किमान ती जागा तारेचं कंम्पाऊंड करून तरी ताब्यात घ्यावी, अशा सुचना केल्या. यावेळी सर्वानुमते हा विषय मंजूर करण्यात आला.

दिड वर्षानंतरही भूखंडाचा ताबा नाही
यावल पालिकेच्यावतीने अनेक ठिकाणी आरक्षण टाकण्यात आले होते ह्या आरक्षण टाकलेल्या जागेपैकी सातोद रस्त्यावर क्रीडांगणासाठी एक आरक्षित भूखंड आहे त्या भूखंडाच्या मालकाने पालिकेच्या विरुद्ध भूखंडाच्या मोबदल्या संदर्भातील न्यायालयात दावा टाकला होता. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशान्वये सुमारे एक कोटी 52 लाख रुपये पालिकेला संबंधिताला द्यावे लागले. दीड वर्ष पैसे देऊन झाले तरीसुद्धा त्या जागेला पालिकेने अधिकृतरीत्या ताबा घेतला नाही. तेव्हा शहरातील जनतेचा पैसा गेला मात्र क्रीडांगण न झाल्याने शहरातील तरूण क्रीडांगणासाठी मुकले आहे. या जागेवर पालिकेने किमान तार कंपाउंड करावं व ती जागा ताब्यात घेतली जावी जेणेकरून शहरातील तरुणांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध होईल, असा मुद्दा नगरसेवक अतुल पाटील यांनी पालिकेत मांडला. तार कंम्पाऊंड करण्याकामी सभागृहाने मंजुरी दिली.

यांची सभेला उपस्थिती
अध्यक्षस्थानी पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते होते. मुख्याधिकारी बबन तडवी, विजय बढे यांनी सभेचे कामकाज पाहिले. सभेमध्ये हे काँग्रेसचे गटनेता सय्यद, नगरसेवक शेख असलम, नगरसेवक डॉ.कुंदन हेगडे व सर्व मान्यवरांची उपस्थिती होती.

या विषयांना सभेत मंजुरी
स्वामीनारायण मंदिराचा रस्ता ट्रिमीक्स काँक्रिटीकरण, स्वामी नारायणस मंदिरामागील रस्ता डांबरीकरण, घनकचरा मंक्तेदाराला मुदत वाढीसह नवीन निविदा प्रक्रिया, विविध वार्षिक सेवा व देेखभाल दुरूस्ती मक्त्यांसह 16 विषयांना मंजुरी देण्यात आली.


कॉपी करू नका.