आंदोलन स्थगित : अकलूदमधील अतिक्रमण हटवण्यासह अवैध धंद्यांना चाप लावावा

भुसावळ शहरातील पत्रकार परीषदेत कोळी महासंघाची मागणी


Movement suspended : Illegal activities should be curbed along with removal of encroachments in Aklud भुसावळ : अकलूद येथील खून प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर कोळी महासंघाने मंगळवारचे आंदोलन स्थगित केले असून दुसर्‍या आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे शिवाय अकलूदसह परीसरातील अवैध धंद्यांना लगाम घालावा तसेच आरोपींच्या घराचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी पत्रकार परीषदेत मंगळवारी करण्यात आली. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मंगळवारी दुपारी 12.30 वाजता कोळी समाज बांधवांतर्फे पत्रकार परीषद झाली. दरम्यान, मंगळवारी होणार्‍या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर तसेच अकलूद गावात मोठा बंदोबस्त यंत्रणेने तैनात केला होता.

पसार आरोपीला करावी अटक
पत्रकार परीषदेला कोळी महासंघाचे प्रभाकर सोनावणे (मोहाडी), जितेंद्र सपकाळे, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरलाल कोळी, रावेर तालुकाध्यक्ष बंडू कोळी, विकास सपकाळे, पाडळसा सरपंच खेमचंद कोळी, श्रीराम सपकाळे, संदीप तायडे, विलास नारायण सोनवणे, अविनाश सोनवणे आदी पत्रकार परीषदेला उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना माहिती देतांना कोळी समाज बांधवांनी सांगितले की, शुभम सपकाळे यांच्यावर संतोष गुप्ता, अविनाश गुप्ता, राज गुप्ता उर्फ भोला, चकर्‍या उर्फ गोविंद जैन, शामलाल गुप्ता यांनी 19 फेब्रुवारीला चाकूने वार केला व जखमी शुभमचा 19 मार्चला उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुभम याच्या मारेकर्‍यांपैकी दोन पसार पैकी संतोष गुप्ता याला नागपूरात अटक करण्यात आली असून दुसरा संशयित पसार असल्याने त्यास अटक करावी, अशी आमची मागणी आहे. मंगळवारी शुभमच्या दहाव्याच्या दिवशी कोळी बांधवांतर्फे रस्ता रोको आंदोलनासह पोलिसांना निवेदन देऊन फैजपूर पोलिस स्टेशनसमोर आंदोलन होणार होते मात्र संशयिताला अटक करण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आता गावातील गुन्हेगारी थांबवण्यासह अतिक्रमण काढावे, अशी मागणी असल्याचे जितेंद्र सपकाळे म्हणाले.



धमक्यांना कोळी समाज भीक घालणार नाही
कोळी समाज बांधवांना धमकीचे फोन येत असलेतरी अशा धमक्यांना कोळी समाज घाबरत नाही, फोनवर धमकी देणार्‍यांनी कोळी समाजबांधवांना धक्का जरी लावला तरी त्याचे काय परीणाम होतात, हे दिसेल. आम्ही कायदा आता घेणार नाही, मात्र आम्ही घाबरत सुध्दा नाही, असे हरलाल कोळी यांनी सांगत गावातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासह अवैध व्यवसाय बंद करावेत, असेही ते म्हणाले. खून प्रकरणी सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जाणार असल्याचे प्रभाकर सोनवणे यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !