यावलमध्ये पत्रकारांचा सन्मान : दिनदर्शिकेचेही प्रकाशन

यावल : पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकारांचा सन्मान तसेच शिवाजी फाऊंडेशन अध्यक्ष अॅड.देवकांत पाटील यांच्या दिशादिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थिीत सोमवारी खरेदी-विक्री संघ जिनिंगच्या सभागृहात करण्यात आले. समाज प्रबोधनात महत्वाची भूमिका बजावणारे , समाज व्यवस्थेचा महत्वाचा आधारस्तंभ असणारे, आपल्या निर्भिड आणि पारदर्शक लेखणीच्या सामर्थ्यावर सामाजिक, आर्थिक, राजकीय, आरोग्यविषयक, शैक्षणिक प्रशासकीय आदी क्षेत्रातील कामांना प्रोत्साहन आणि कमतरतेवर बोट ठेवत समाजात एक चांगला पायंडा घालून देणर्या पत्रकार बंधूंचा डायरी, पेन, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या मान्यवरांची उपस्थिती
देवकांत पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनतर्फे उपस्थित मान्यवर माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, ज्येष्ठ नेते गिरीधर पाटील, नितीन व्यंकट चौधरी, सीताराम पाटील, पोलिस निरीक्षक् अरुण धनवडे, अनिल साठे, बोदवडे नाना, उमेश फेगडे, बाळू फेगडे, कदीर खान, शशांक देशपांडे, सागर देवांग, चंद्रकांत येवले, हेमंत येवले सर, शेख अशपाक, नायब तहसीलदार आर.ए.माळी, अॅड.भरत चौधरी, बाजीराव पाटील, यावल तालुका मराठा सेवा संघ अध्यक्ष अजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनिदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी यावल तालुक्यातील तालुका पत्रकार प्रतिनिधींचा आमदार शिरीष चौधरी आणि छत्रपती फाऊंडेश चे अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रतिनिधींचर सन्मान
त्यात डी.बी.पाटील, सुरेश पाटील, अरुण पाटील, राजु कावडीवाले, शेखर पटेल ,
तेजस यावलकर, प्रमोद वाणी, भरत कोळी, सुनील गावंडे, अयुब पटेल, शेख काबीज, पराग सराफ यांचा पत्रकार दिना निमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे छत्रपती शिवाजी फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड.देवकांत पाटील, मराठा सेवा संघ सचिव संतोष पाटील, अॅड.भरत चौधरी, भूषण नागरे, गोलू माळी, नरेंद्र शिंदे, राजू कारंडे, दीपक पाटील, प्रशांत पाटील यांनी आयोजन केले. कार्यक्रमासाठी गोकुळ पाटील, गोकुळ महाराज, अजबराव पाटील, रणधीर पाटील, गुलाब पाटील, समाधान पाटील, गिरीष पाटील, निलेश धनगर, फकिरा पाटील, महेंद्र पाटील, प्रताप पाटील आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक अजय पाटील तर आभार छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन अध्यक्ष देवकांत पाटील यांनी मानले.


