साकळीतील युवकाचे हृदयविकाराने निधन


यावल : तालुक्यातील साकळी येथील 24 वर्षीय युवकाचे हृदयविकाराने निधन झाल्याची घटना मंगळवारी घडली. यशवंत उर्फ गोलू सोनार असे मयताचे नाव आहे. साकळीतील इंदिरा नगर प्लॉट भागातील रहिवासी असलेला यशवंत (गोलू) सुरेश सोनार (24) याची मंगळवारी सकाळी तब्बेत खालावल्याने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला तत्काळ जळगाव येथे हलविण्याचे सूचित केल्यानंतर प्रा.आ.केंद्राच्या रुग्णवाहिकेनेच जळगाव येथे नेत असतांना जळगाव येथील शिवाजी पुलाजवळ रस्त्याचे सुरू असलेले काम व वाहतुकीची अडचण आल्याने मोठा वेळ वाया गेल्याने यशवंतला खाजगी दवाखान्यात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत यशवंत हा कुटुंबियांचा एकुलता एक मुलगा होता व त्याला एक विवाहित बहिण आहे. त्याच्या वडिलांचे गेल्या दहा वर्षापूर्वीच निधन झाल्याने त्याची विधवा आई त्याच्यासह कुटुंब सांभाळत होती. तो यावल येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा पदवीधर विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.