खिर्डी खुर्दमधील जीर्ण शाळा पाडण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर

ग्रामपंचायतीचा प्रस्ताव धूळखात : दुर्घटनेपूर्वीच दखल घेण्याची अपेक्षा


खिर्डी : खिर्डी खुर्द गावातील निंभोरा रस्त्यावर 1957 मध्ये उभारण्यात आलेली जिल्हा परीषद शाळेची इमारत जीर्ण झाली असून केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. चार पैकी दोन कॉलमवर इमारत उभी असून ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिल्यानंतर जिल्हा परीषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेण्यात आली नसल्याने दुर्घटना घडल्यास जवाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जीर्ण व अर्धवट अवस्थेत पडलेल्या वर्ग खोल्यांचे खिडक्या, दरवाजे, फरशी हे अज्ञातांनी चोरून नेले असून वर्ग खोल्या केव्हा जमिनीवर कोसळतील? याचा भरवसा नाही. अंगणवाडीतील विद्यार्थी या ठिकाणी खेळण्यासाठी येत असून तसेच आजूबाजूला ग्रामस्थांचा रहिवास असल्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करीत असल्याने त्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.

दुर्घटना घडल्यास जवाबदार कोण
जीर्ण वर्ग खोल्या पूर्णपणे पाडून इमारत पाडावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे तसेच शाळेच्या आवारात गावातील मुले जुन्या शाळेच्या ओट्यावर खेळत असताना छतावरील कौले (स्लॅप) पडत असल्याने भविष्यात काही दुर्घटना घडल्यास जवाबदार कोण? असा प्रश्न गावातील ग्रामस्थ करीत आहेत. सर्व बाबीकडे संबंधीत विभागाचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. भिंतीने सुध्दा जॉइंट सोडले असून कोणत्याही क्षणी पडू शकतात तसेच शाळेच्या मागील बाजूने राहत असलेल्या रहिवाशांच्या जीवाला सुध्दा धोका निर्माण असल्याने तातडीने दखल घेवून इमारत जमीनदोस्त करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत ग्रामस्थांसह पालकवर्ग करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !