‘बहुजन क्रांती’च्या मोर्चाने दणाणले भुसावळ


सीएए व एनआरसी कायद्याला तीव्र विरोध : डी.एस.ग्राऊंडवरील जाहीर सभेत केंद्रावर सडकून टिका

भुसावळ : सीएए व एनआरसी कायद्याला तीव्र विरोध दर्शवत बुधवारी सकाळी 11 वाजता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान कायद्याला विरोध दर्शवत मोर्चेकर्‍यांनी घोषणाबाजी केली. अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या या मोर्चात हजारो विविध धर्मीय बांधव सहभागी झाले. डी.एस.ग्राऊंड (डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगण) मोर्चा पोहोचल्यानंतर विविध मान्यवरांनी कायद्याला विरोध दर्शवत केंद्र सरकारवर सडकून टिका केली. प्रसंगी पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त राखण्यात आला. बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोर मोर्चा आल्यानंतर तसेच गांधी पुतळ्याजवळ मोर्चा आल्यानंतर वाहतूक थांबवण्यात आली.

 


कॉपी करू नका.