सार्वजनिक कीर्तन महोत्सवात एक हजारांवर नागरीकांची आरोग्य तपासणी


भुसावळ : वांजोळा रोडवरील आपले परीवार सार्वजनिक वाचनालय व सद्गुरु धनजी महाराज प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक भव्य किर्तन महोत्सव 5 ते 12 जानेवारी दरम्यान सुरू असून त्या अंतर्गत 8 रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा 1013 नागरीकांनी लाभ घेतला. उद्घाटन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, नगरसेवक पिंटु ठाकूर, नगरसेविका शोभा नेमाडे, रजनी सावकारे, विनीता नेवे व शिबिरात सेवा देण्यासाठी आलेले जळगाव येथील सांधे प्रत्यारोपण व गुडघे तज्ञ डॉक्टर मनिष चौधरी, कार्डिओलॉजिस्ट डॉ.संदीप भारुडे, जनरल सर्जन डॉक्टर सुमित चौधरी, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रीती भारुडे, डॉ.चेतन कोळंबे, डॉ.पवन सरोदे, बालरोगतज्ञ डॉ.सुयोग तन्निरवार, डॉ.प्रहिज फालक उपस्थित होते. या शिबिरात 320 नागरीकांची रक्त तपासणी, 195 रुग्णांची गुढघे व सांधे प्रत्यारोपण तपासणी तर 162 महिलांची स्री तज्ज्ञांनी तपासणी केली तसेच 152 बालकांची बालरोग तज्ज्ञांनी तसेच 184 रुग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. शिबिरास किशोर चौधरी, गोविंद वराडे, अजय वाघोदे, सतीश ढाके, श्रीकांत पाटील, नेमीचंद धांडे, प्रदीप मनसुटे, उदय बोंडे, राहुल भारंबे, पराग पाटील, हर्षा पाटील यांनी सहकार्य केले .

11 रोजी मान्यवरांचा सन्मान
11 रोजी विविध क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे तर 12 रोजी सकाळी नऊ वाजता भव्य दिंडी सोहळा निघेल. यात भुसावळ परीसरासह पंचक्रोशीतील सर्व कीर्तनकार, टाळकरी, माळकरी, वारकरी, भजनी मंडळे सहभागी होतील. दुपारी दोन वाजेपासून महाप्रसादाचे वितरण होऊन कीर्तन महोत्सवाची सांगता होईल.


कॉपी करू नका.