उन्हाचा दाह सोसवेना : भुसावळ शहराचा पारा 44 अंशावर


No heatstroke : Mercury in Bhusawal city is at 44 degrees भुसावळ  : राज्यात सर्वाधिक हॉट शहर म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराचा पारा मंगळवारी तब्बल 43.9 अंशावर नोंदवण्यात आल्याची माहिती शहरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाने दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी शहराचे किमान तापमान 25.2 तर कमाल तापमान 43.9 राहिले. आगामी काळात शहराचे तापमान आणखीन वाढण्याची दाट शक्यता आहे.

तापमान 48 अंशावर जाणार !
पश्चिमी भागातून येणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे आगामी काही दिवसात शहराचा पारा 48 अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनूष्य होत असून सायंकाळी उशिरानंतरच नागरीक घराबाहेर पडत आहे. भुसावळातील वेलनेस वेदरचे निलेश गोरे यांच्या माहितीनुसार, मंगळवरी भुसावळसह जळगाव 45 तर अमळनेर, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, पाचोरा व रावेर शहराचा पारा 44 अंशावर पोहोचला तर यावल, धरणगाव, चोपडा, बोदवड या शहरांचा पारा 43 अंशावर पोहोचला तर चाळीसगावचे तापमाने तुलनेने 42 अंश राहिले. आगामी काही दिवसात पुन्हा तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तापमानवाढीमुळे दुपारच्या वेळी रस्ते निर्मनूष्य होत असून सायंकाळी उशिरानंतरच नागरीक घराबाहेर पडत आहे. शीतपेयांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे आईसक्रीम, ऊसाचा रस, मठ्ठा आदी शितपेयांना मागणी वाढली आहे.


कॉपी करू नका.